नीरा, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील नीरा येथील दहावीच्या केंद्रातून चार विद्यालयातील 278 पैकी 271 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, केंद्राचा निकाल 97.48 टक्के लागला आहे. रयत संकुलातील सौ. लिलावती रिखवलाल शहा कन्या शाळा, पिंपरे (खुर्द) येथील बाबालाल साहेबराव काकडे विद्यालय व गुळूंचे येथील ज्योतिर्लिंग हायस्कूलचा निकाल निकाल 100 तर महात्मा गांधी विद्यालयाचा 91.66 टक्के लागला आहे.
नीरा केंद्रात सौ. लिलावती रिखवलाल शहा कन्याशाळेच्या श्रेया किकले व इशिता कदम (94 टक्के), श्रावणी गायकवाड हिने (92.60 टक्के), स्नेहा मोहित (92.40 टक्के) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकवला आहे.
नीरा येथील महात्मा गांधी विद्यालयातील 84 पैकी 77 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम तीन (टक्के); मुज्जमिल तांबोळी (89.50), हर्ष गालिंदे (87.60), सुमित कहार (86.60). सौ. लि.रि.शहा कन्या शाळेतील प्रथम तीन विद्यार्थी (टक्के); श्रेया किकले, इशिता कदम (दोघींना 94), श्रावणी गायकवाड (92.60), स्नेहा मोहिते (92.40).
पिंपरे (खुर्द) येथील बाबालाल साहेबराव काकडे विद्यालयातील प्रथम तीन विद्यार्थी (टक्के) : विश्व कुसेकर (91.60), वैष्णवी थोपटे (86.60), अल्बाज शेख (86.40). गुळूंचे येथील ज्योतिर्लिंग हायस्कूलमधील प्रथम तीन विद्यार्थी (टक्के); आदित्य निगडे (90.80), अवधूत रणवरे (86.60), आर्या निगडे (85.20).