गरज ग्रीन बिल्डिंगची (भाग-१)

इमारतींची रचना करताना पर्यावरणाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. काही महानगरपालिकांनी विकासकांना वृक्षारोपणाची अट घातलेली असली तरी सर्वच शहरात असे चित्र नाही. म्हणूनच अलिकडच्या काळात ग्रीन बिल्डिंगच्या निर्मितीवर भर दिला जात आहे.

दरवर्षी पाच जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. यामागे एकच उद्देश तो म्हणजे, पर्यावरणासंबंधी जगभरात जनजागृती करणे. गेल्या काही वर्षांपासून मानवी कृत्यामुळे निसर्गाची आणि पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. वाढते शहरीकरण, रस्ता रुंदीकरण, मानवाचा हलगर्जीपणा, बेसुमार जंगलतोड या कारणांमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. एवढेच नाही तर पर्यावरणाचा नाश होण्यात गगनचुंबी इमारती आणि पायाभूत सुविधांची व्यापक उभारणी या घटकाचा मोठा वाटा आहे. इमारतीच्या बांधकामापासून ते त्याच्या उपयोगापर्यंत पर्यावरणाला विविध पातळ्यांवर बाधा आणली जाते.

इमारतींची रचना करताना पर्यावरणाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. काही महानगरपालिकांनी विकासकांना वृक्षारोपणाची अट घातलेली असली तरी सर्वच शहरात असे चित्र नाही. म्हणूनच अलिकडच्या काळात ग्रीन बिल्डिंगच्या निर्मितीवर भर दिला जात आहे. पर्यावरणाची होणारी हानी रोखायची असेल तर इको फ्रेंडली बांधकाम तसेच इमारतींना प्रोत्साहित करावे लागेल.

ग्रीन बिल्डिंगला ओळखा
ऊर्जेचा वाढता वापर आणि दुसरीकडे वाढते कार्बन डायऑक्‍साइड उत्सर्जन यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. निसर्गाचा ऱ्हास होण्यासाठी हाच घटक जबाबदार मानला जात आहे. 40 टक्के विजेचा खप आणि 24 टक्के कार्बन डायऑक्‍साइड उत्सर्जनासाठी पारंपरिक पद्धतीने तयार करणाऱ्या इमारती जबाबदार आहेत. ग्रीन बिल्डिंग मात्र यास अपवाद ठरते. ग्रीन बिल्डिंगमुळे पर्यावरणाची हानी कमी होतेच त्याचबरोबर सर्वसाधारण बांधकामाच्या तुलनेत पर्यावरणपूरक बांधकामास कमी पाणी लागते. नैसर्गिक ऊर्जेचा अधिक वापर होतो. नैसर्गिक स्रोताची जपवणूक होते. कचऱ्याचे प्रमाणही अत्यल्प राहते. एकंदरीत पर्यावरणपूरक इमारतीत राहणाऱ्यांना आरोग्यदायी वातावरण लाभते. ग्रीन बिल्डिंग हे साधारण घराच्या तुलनेत 30 ते 40 टक्के वीज बचत करते आणि 70 टक्‍क्‍यांपर्यंत पाण्याची बचत करते.

भारतात ग्रीन बिल्डिंगचे रेटिंग सिस्टिम्स
कोणत्याही इमारतीला ग्रीन रेटिंग करणारे भारतात दोन रेटिंग सिस्टिम आहेत. पहिले म्हणजे द लीडरशीप इन एनर्जी अँड एन्वायरमेंटल डिझाइन त्याला आपण लीड म्हणतो. त्यास इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) द्वारा सादर केले जाते. आयजीबीसी ही एक इंडस्ट्री लॉबी समूह आहे. दुसरे म्हणजे द ग्रीन रेटिंग फॉर इंटिग्रेटेड हॅबिटाट असेसमेंट म्हणजेच ग्रिहा असे म्हटले जाते. या सिस्टिम्सला दिल्लीतील संस्था द एनर्जी अँड रिसोर्सोस इन्स्टिट्यूट (टेरी) आणि यूनियन मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्यूऍबल एनर्जीने संयुक्त रुपातून विकसीत केले आहे. ही रेटिंग सिस्टिम एकप्रकारची बेंचमार्क समजली जाते.

गरज ग्रीन बिल्डिंगची (भाग-२)

लीड रेटिंग कसे मिळते?
लीड इंडिया सर्टीफिकेशन स्कीम ही सर्वप्रकारच्या नव्या व्यावसायिक इमारतींसाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, ऑफिस बिल्डिंग्ज, रिटेल कॉम्प्लेक्‍स, आयटी पार्क, एअरपोर्ट, हॉटेल्स, हॉस्पिटल्स, स्कूल, कॉलेज तसेच ऐतिहासिक इमारती, वारसा म्हणून घोषित केलेल्या वास्तू यास लीड इंडिया सर्टिफिकेशनसाठी आयजीबीसीकडे नोंदावे लागते. विशेष म्हणजे याप्रकारच्या रेटिंगने इमारतीचे मूल्य आणि महत्त्व वाढत जाते.

– विधिषा देशपांडे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)