शिवराय, शंभुराजांचे विचार अंगिकारण्याची गरज

रांजणगाव गणपती – छत्रपती शिवाजीमहाराज आणि धर्मवीर संभाजीमहाराज यांचे विचार अंगिकारले तर जीवनात कोणतीही गोष्ट अशक्‍य नाही, असे प्रतिपादन स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत येसुबाईंची भूमिका अजरामर करणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी केले.

कोंढापुरी (ता. शिरूर) येथे माध्यमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, यावेळी त्या बोलत होत्या. त्यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना सायकल, घड्याळ, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर, ज्येष्ठ विचारवंत विवेक वेलणकर, मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, सरपंच नंदा ढसाळ, उपसरपंच आशिष गायकवाड, प्रफुल्ल कोठारी, अजय दुधाणे, माजी सरपंच अर्जुन गायकवाड, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दशरथ गायकवाड, सविता गायकवाड, दिनेश गायकवाड, शामराव गायकवाड, बळवंत गायकवाड, पोपटराव गायकवाड, ग्रामसेवक गंगाधर देशमुख, केंद्रप्रमुख श्रीहरी पावसे, मुख्याध्यापक दौंडकर, सुदाम लंघे, अनिल महाजन, बापु खारतोंडे वृंद उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)