सीसीटीव्ही काळाची गरज..

सुरक्षेच्या दृष्टीने तिसऱ्या डोळ्यांची म्हणजेच सीसीटीव्हीची गरज आहे. घर, ऑफिस, सोसायटी, हॉटेल्स, अशा अनेक ठिकाणी इंटरनेटद्वारे लॅपटॉप, स्मार्ट मोबाइल फोनच्या माध्यमातून आपल्याला सीसीटीव्हीच्या आधारे नजर ठेवण्यासाठी मदत होत आहे, विप्र एंटरप्रायजेस कडे अनेक प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे गरजेनुसार उपलब्ध आहेत.

सध्या आपल्या सुरक्षेची काळजी आपणच घेणे गरजेचे आहे. आपण कुठे घराबाहेर गेलो, तरी आपले निम्मे लक्ष घराकडे असते. घरी चोरी तर होणार नाही ना याची काळजी आपल्याला वाटत असते. आपण ऑफिस, दुकान रात्री बंद करून घरी आलो तरी रात्री काही घडणार नाहीना याची चिंता सकाळी दुकानदाराला दुकानावर किंवा ऑफिस वर पोहोचेपर्यंत असते. या चिंतेपासून आपल्याला मुक्त राहायचे असेल, तर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याशिवाय पर्याय नाही. विप्र एंटरप्रायजेस आपल्याला या काळजीपासून मुक्त ठेवण्यासाठी तुम्हास मदत करू शकते. आपल्याला आवश्‍यकतेनुसार सीसीटीव्हीचे नियोजन आम्ही आपल्याला करून देऊ शकतो. त्यासाठी सर्व प्रकारचे कॅमेरे विप्र एंटरप्रायझर्सकडे उपलब्ध आहेत.

विशेष करून रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसणारे कॅमेरे सध्या आवश्‍यक आहेत. दुकानदारांकडून या कॅमेरांची मागणी जास्त असते. त्याचबरोबर ज्याठिकाणी रोख रक्कमेचे व्यवहार चालतात त्याठिकाणी देखरेख ठेवण्यासाठी कॅमेरे बसविण्यात येतात. त्यासाठी सुद्धा अगदी बारीक हालचाली टिपणारे कॅमेरे सुद्धा उपलब्ध आहेत.

“तुमची सुरक्षा आम्हास काळजी रे’ या ब्रीद वाक्‍यानुसर आम्ही काम करत असल्याचे सचिन विप्र यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.