लाहोर – पाकिस्तानचा प्रमुख फलंदाज बाबर आझम याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नव्या विक्रमांची नोंद केली आहे. त्याने नेदरलॅण्डविरुद्ध झालेल्या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
त्याने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 74 धावांची खेळी केली. त्याचे 18 वे एकदिवसीय शतक जरी पूर्ण होऊ शकले नाही तरीही त्याने कारकिर्दीतील 20 वे अर्धशतक नोंदवले. तसेच आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या बाबरने गेल्या 8 एकदिवसीय सामन्यांमध्ये 7 वेळा अर्धशतक किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याचा अनोखा विक्रम साकार केला.
सध्या खेळत असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंमध्ये केवळ बाबरच सध्या तुफान भरात आहे. त्याने अनेक विक्रम साकार करताना भारताचा विराट कोहली, इंग्लंडचा ज्यो रूट व ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ यांनाही मागे टाकले आहे.