दिल्लीतील मोर्चासाठी पंजाबमधून 40 हजार महिला रवाना

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय महिला दिनी काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी पंजाबमधून सुमारे 40 हजार महिला निघाल्या आहेत, अशी माहिती शेतकरी संघटनांनी रविवावरी दिली. बहुतांश जणींनी आज सकाळी आपले गाव सोडले आहे.

या मोर्चात अधिकाधिक महिलांचा सहभाग असावा, या हेतूने पंजाबमध्ये विविध जिल्ह्यात ट्रॅक्‍टर रॅलींचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. बर्नालामध्ये बहुतांश ट्रॅक्‍टर महिलांनी चालवले. तर भटींडामध्ये पुरूष आणि महिला ट्रॅक्‍टर चालक असे दोघेही सहभागी झाल्याचे आढळले.

या महिलांच्या मुलांची वार्षिक परीक्षा जवळ आल्याने त्या नऊ मार्चला गावी परततील. तर काही जणी दिल्लीतील आंदोलनात थांबणार आहेत. मानसा येथून शेकडो महिलांनी रविवार्वी सकळी दिल्लीकडे कुच केले आहे, असे भारतीय किसान युनियनचे बलबीर कौर यांनी सांगितले.

भारतीय किसान युनियन उघरण गट यांची महिला आघाडी सर्वात मोठी आहे तीही या आंदोलनात सहभागी होत आहे. या संघटनेचे सरचिटणीस सुखदेवसिंग कोक्रीकालन म्हणाले, आम्ही 500 बस, 600 मिनी बस, 115 ट्रक आणि 200 छोटी वाहने सोडली आहेत. आज रात्रीपर्यंत या महिला टिकरी सीमेवर पोहचतील.

भारतीय किसान युनियनचे (डकौंडा) सरचिटणीस जगमोहन सिंग आमच्या संघटनेतील ज्येष्ठ नेते व्यासपीठाजवळ असतील. मात्र या कार्यक्रमाचे संचलन हे महिलांकडूनच केले जाईल. सर्व वक्‍त्यांना प्रक्षोभक बोलू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आपल्या मुद्‌द्‌यावरून हटायचे नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.