अहमदाबाद- आठ फुट उंचीचा माणूस तुम्ही पाहिलाय का? असं विचारलं तर अनेकांच्या भूवया उचावतील तर अनेक लोक सर्कशीत पाहिला आहे, असं उत्तर देतील. मात्र भारत कशातच कमी नाही . आठ फुट उंची असलेला माणूस आपल्या भारतात आहे. विशेष म्हणजे माणसाने गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सगळ्यात उंच माणसाचा रेकॉर्ड केला आहे.
धर्मेद्र सिंग प्रताप असं या 45 वर्षीय माणसाचं नाव आहे. ते उत्तर प्रदेशचे रहिवासी आहे. त्यांची उंची आठ फुट दोन इंच आहे. या उंचीमुळे ते भारतातील सगळ्यात उंच माणूस म्हणून ओळखले जातात. नुकताच त्यांच्या उंचीमुळे त्यांनी सर्वात उंच माणसाला गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड देउन सन्मानित केलं आहे.
धर्मेंद्र यांच्या उंचीमुळे त्यांना मान मिळतो आहे मात्र याच उंचीमुळे त्यांना अनेक समस्यांचा सामनाही करावा लागत आहे. काही वर्षांपुर्वी त्यांचं एक ऑपरेशन झालं होतं त्यावेळी त्यांच्यासाठी खास बेड उपलब्ध करावा लागला होता.
45 वर्षीय धर्मेद्र अजुनही विवाहबंधनात अडकले नाही कारण त्यांच्या उंचीची मुलगी सापडली नाही. काही वर्षांपुर्वी त्यांनी हिप ट्रान्सप्लँट करुन घेतलं आहे.
#Pratapgarh: Dharmendra Pratap Singh, said to be India’s tallest man, who has found a mention in the #GuinnessWorldRecords, now claims that his height – 8 feet two inches-is no longer a boon but a bane for him.
He is 45 years old but has not found a wife for himself. pic.twitter.com/MLaFMVmcEu
— IANS Tweets (@ians_india) November 6, 2020