चंद्राबाबूंसाठी एनडीएचे दरवाजे कायमचे बंद : अमित शहा

file photo

अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू हे देशातील यू-टर्न सीएम आहेत. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या तेलगू देसम पक्षासाठी (टीडीपी) एनडीएचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत, असे टीकास्त्र भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी सोडले.

आंध्र भाजपचे अध्यक्ष कन्ना लक्ष्मीनारायण यांच्या राज्यव्यापी बस यात्रेला हिरवा कंदील दाखवल्यानंतर झालेल्या सभेत शहा बोलताना शहा यांनी चंद्राबाबूंवर टीकेची झोड उठवली. चंद्राबाबूंनी प्रत्येक बाबीवर अगणित वेळा भूमिका बदलली. ते 1978 मध्ये सर्वप्रथम कॉंग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 1983 मध्ये ते टीडीपीमध्ये दाखल झाले. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान बनले तेव्हा सत्तेसाठी चंद्राबाबू एनडीएचे घटक बनले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भाजपच्या पराभवानंतर 2004 मध्ये ते एनडीएमधून बाहेर पडले. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अफाट लोकप्रियता पाहून ते त्यांच्या पाया पडले आणि पुन्हा एनडीएत आले. स्वत:च्या गैरकारभारावर आणि भ्रष्टाचारावर आंध्रची जनता संतप्त बनल्याची जाणीव झाल्यावर ते पुन्हा एनडीएमधून बाहेर पडले आणि भाजपच्या नेतृत्वाला दोष देऊ लागले. काही दिवसांपूर्वी त्यांनी कॉंग्रेसची हातमिळवणी करून तेलंगण विधानसभा निवडणूक लढवली. तेलंगणमध्ये पराभूत व्हावे लागल्यानंतर ते तथाकथित महाआघाडीचा नेता बनण्यासाठी प्रयत्नशील आहेत, अशी खिल्ली शहा यांनी उडवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)