बुलबुलला भिडण्यास एनडीआएफ सज्ज

NDAF ready to face bulbul
नवी दिल्ली : बुलबुल वादळाने धारण केलेले तीव्र रूप पाहता राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआएफ) 34 पथके ओडीशा आणि प. बंगालमध्ये तळ ठोकून आहेत. दोन्ही राज्यात प्रत्येकी 17 पथके पाठवण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यास एनडीआएफ सज्ज आहे, असे एनडीआएफचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी सांगितले. दलाच्या प्रत्येक पथकात 45 व्यक्ती असतात.

प्रधान म्हणाले, ओडीशात प्रत्यक्षात सहा पथके तैनात करण्यात असून उर्वरीत 11 पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे प. बंगालमध्ये 10 पथके तैनात केली असून उर्वरीत परिस्थितीनुरूप तैनात करण्यात येणार आहेत. दोन्ही राज्यातील प्रशासनाशी आमची पथके संपर्क ठेवून आहेत. वादळाल सामोरे जाण्याची सर्व पूर्व तयारी झाली आहे. मंत्रीमंडाळाचे सचिव राजीव गौबा यांनी बचाव आणि मदत कार्याच्या तयारीचा शुक्रवारी आढावा घेतला.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रविावरी सकाळी बंगालच्या उपसागरातील हे वादळ प. बंगालच्या किनारपट्टीवर आदळेल. त्यावेळी मुसळधार वृष्टी होण्याची शक्‍यता असून सुमारे 110 ते 112 किमी प्रतीतास वेगाने वारे वाहण्याची शक्‍यता आहे. तर लाटांची उंची सुमारे दीड मिटर असेल.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×