Ind vs SA : पहिल्या दिवशी भारताची आक्रमक सुरूवात, रोहितची अर्धशतकी खेळी

विशाखापट्टणम – भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चांगली सुरूवात केली आहे. पहिल्या सत्राअखेरीस भारताने बिनबाद ९१ धावांपर्यंत मजल मारली आहे. लोकेश राहुलच्या अनुपस्थितीमध्ये हिटमॅन रोहित शर्माला भारतीय संघात जागा मिळाली. या संधीचे रोहित शर्माने सोने केले आहे. रोहितने गोलंदाजांचा समाचार घेत अर्धशतक झळकावल. त्याने ८४ चेंडूत ५२ धावा झळकावले.

लोकेश राहुल कसोटी मालिकेत स्थान मिळवण्यात अपयशी ठरल्याने निवड समितीने रोहित शर्मावर विश्वास टाकत त्याला कसोटी सामन्यात सलामीला येण्याची संधी दिली. मात्र आफ्रिकेविरुद्ध सराव सामन्यात रोहित अवघे २ चेंडू खेळत शून्यावर माघारी परतला होता.

त्यामुळे आजच्या कसोटीमध्ये रोहित कशी कामगिरी करतो याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. मात्र, पहिल्या दिवशी रोहितने भारताला आक्रमक सुरुवात करुन दिली आहे. दुसऱ्या बाजूने मयांक अग्रवालनेही रोहितला चांगली साथ दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.