आशिष शेलार तुम्ही झोपले होते का?

पवारांवरील आरोपांवर राष्ट्रवादीचे सडेतोड उत्तर

मुंबई –  प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने-सामने आले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावरून आता राष्ट्रवादीने शरद पवारांच्या फेसबुक लाईव्हची लिंक शेअर करत शेलारांना प्रत्यूत्तर दिले आहे.

माथी भडकावण्याचे काम शरद पवार यांच्याकडून अपेक्षित नाही; भाजप नेता

यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी पवार यांनी मंगळवारी केलेल्या लाईव्ह व्हिडीओची लिंक शेअर केली आहे. ”जेव्हा शरद पवार काल फेसबुकवर लाईव्ह बोलत होते तेव्हा आशिष शेलार तुम्ही झोपले होते का? असा सवाल केला आहे.  गुड मॉर्निंग आशिष शेलार, झोपेतून उठा आणि ही लिंक चेक करा.”, असे ट्विट करत शेलारांनाही यामध्ये टॅग केले आहे.

दरम्यान, हिंसाचार करणाऱ्यांविरोधात एक चकार शब्द काढला नाही. रोज वचवच करणारे संजय राऊत देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत. कधी काळी आवश्यक असल्यावर फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवार साहेब तुमची फेसबुक पोस्ट जवान आणि पोलसांच्या बाजूने का आली नाही? सगळ्या आंदोलनात इतर लोकांचा जो वावर आहे त्याचे समर्थक शरद पवार आणि संजय राऊत तुम्ही आहात. तुमची तोंडे आता का शिवली आहेत हा प्रश्न आम्ही तुम्हाला देशवासियांच्या वतीने विचारत आहोत, असे आशिष शेलार यांनी म्हंटले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.