-->

वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या प्रमिला बाफना विजयी

  • भाजपाच्या सुनीता भिलारे यांचा पराभव; महाविकास आघाडीची एकजूट

वडगाव मावळ – वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी निवडणुकीत महाविकास आघाडी व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका प्रमिला राजेश बाफना यांनी भाजपाच्या उमेदवार सुनीता खंडू भिलारे यांचा दोन मतांनी पराभव करुन विजयी झाल्या. बाफना यांना दहा मते मिळाली, तर भिलारे यांना आठ मते मिळाली.

यापूर्वीचे उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे यांच्या पदाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. रिक्‍त झालेल्या पदासाठी सोमवारी (दि. 25) पिठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेऊन उपनगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली.

या वेळी उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमिला बाफना व भाजपच्या वतीने सुनीता भिलारे यांनी उमेवारी अर्ज दाखल केला. या वेळी मतदान घेण्यात आले. प्रमिला बाफना यांना दहा मते मिळाली, तर सुनीता भिलारे यांना आठ मते मिळाल्याने प्रमिला बाफना 2 मतांनी विजयी झाल्याचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी जाहीर केले.

या वेळी उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, महाआघाडीचे नगरसेवक गटनेते राजेंद्र कुडे, माया चव्हाण, राहूल ढोरे, पूजा वहिले, पूनम जाधव, सायली म्हाळसकर, शारदा ढोरे, सुनील ढोरे तर भाजपचे गटनेते दिनेश ढोरे, विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर, किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, प्रवीण चव्हाण, दीपाली मोरे, दशरथ खेंगले आदी नगरसेवक उपस्थित होते.

निवड जाहीर झाल्यानंतर संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक सुभाषराव जाधव, माजी सभापती गणेश आप्पा ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, चंद्रजीत वाघमारे, अशोक बाफना आदींनी अभिनंदन केले.
या वेळी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे, मंगेश काका ढोरे, सुनील चव्हाण, किसन वहिले, चंद्रकांत ढोरे, गंगाराम ढोरे, सुरेश कुडे, शांताराम कुडे, विशाल वहिले, पंढरीनाथ ढोरे, अविनाश चव्हाण, सुनील शिंदे, राजेश बाफना, प्रवीण ढोरे, अतुल राऊत, मंगेश खैरे, रोहिदास गराडे, सोमनाथ धोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.