शिवसेनेने स्पष्ट भूमिका घेतल्यास राज्यात वेगळी स्थिती निर्माण होऊ शकते – नवाब मलिक

File photo

मुंबई – शिवसेनेने जर स्पष्ट भूमिका घेतली तर राज्यात वेगळी स्थिती निर्माण होऊ शकते, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईमध्ये केले आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची आज प्रदेश कार्यालयात बैठक झाली. त्यापूर्वी मलिक यांनी माध्यमांना याबाबत प्रतिक्रिया दिली. या बैठकीत पराभूत उमेदवारांना पक्षाध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अजित पवार यांनी मार्गदर्शन केले.

‘आमच्या महाआघाडीकडे बहुमत असते, तर आम्ही केव्हाच सरकार स्थापन केले असते. जनमताचा कौल पाहता आम्ही विरोधी पक्षात बसण्याची भूमिका घेतली आहे. आमच्याकडे सत्ता स्थापन करण्यासाठी १४५ आमदारांच्या संख्याबळाचा जादुई आकडा नाही’, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यपालांची भेट घेणार असल्याचेही मलिक यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, या बैठकीला राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)