तिवरे धरणफुटी विरोधात राष्ट्रवादीचे ‘खेकडा’ आंदोलन

मंत्री महोदयांच्या बंगल्याबाहेर सोडले ‘खेकडे’

पुणे – चपळून येथील तिवरे धारण फुटण्यासाठी खेकडे जबाबदार असल्याचा अजब दावा करणारे महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्याविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. कोकणातील तिवरे धरण फुटल्याने मोठी जीवितहानी झाली होती. मात्र मंत्री महोदयांनी तिवरे धरण फुटीबाबत अजब तर्क लावत सदर धरणफुटीसाठी खेकडे जबाबदार आहेत असं वक्तव्य केलं होतं.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या पुण्यातील  निवासस्थानाबाहेर खेकडे सोडत त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला. मंत्री महायदयांच्या निवासस्थानी खेकडे सोडण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी खेकड्यांचे फोटो असलेले बॅनर अंगावर लटकावले होते. या बॅनरवर खेकड्यांच्या फोटोंसह ‘मी निर्दोष आहे, माझा काय दोष?’ असा खोचक संदेश देखील छापण्यात आला होता.

#WATCH: NCP workers stage protest and threw crabs outside the residence of Maharashtra Water Conservation Minister Tanaji Sawant in Pune against his statement on Ratnagiri’s Tiware dam breach. The Minister had said that crabs were responsible for the breach in the dam. pic.twitter.com/7wbsT8yGIs

— ANI (@ANI) July 9, 2019

हे देखील वाचा :

तिवरे धरण फोडल्याची खेकड्यांनी दिली कबुली?

तिवरे धरण दुर्घटना : शिवसेना आमदाराच्या कंपनीवर गुन्हा दाखल करा – विजय वडेट्टीवार

 

Leave A Reply

Your email address will not be published.