इंदापूर तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची मर्जी: एकाच तालुक्यातून दोन आमदार

मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी यशवंतराव माने यांची उमेदवारी जाहीर

रेडा(प्रतिनिधी): पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मर्जी सातत्याने राहिलेली आहे. मात्र यंदा या तालुक्यातील विधानसभेचे तिकीट देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतच आमदार दत्तात्रय भरणे यांना मिळणार आहे. तर याच तालुक्यातील इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती यशवंतराव माने यांना मोहोळ राखीव विधानसभा मतदार संघासाठी उमेदवारी जाहीर करून चक्क उमेदवारी अर्ज मोहोळ येथे दाखल केला आहे त्यामुळे एकाच इंदापूर तालुक्यातील दोन आमदार विधानसभेत काम करणार आहेत हे मात्र निश्‍चित झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून परिचित आहे या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून रमेश कदम हे आमदार झाले.मात्र कदम यांना एका महामंडळाच्या प्रकरणामुळे जेलमध्ये जावे लागले. त्यामुळे रमेश कदम यांचा करिष्मा या मतदारसंघात यशस्वी ठरल्यामुळे पक्षाध्यक्ष शरद पवार व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या परिपक्व विचाराचा उमेदवार या मतदारसंघात असावा म्हणून थेट इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती यशवंतराव माने यांना पसंती देत मोहोळ या विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे.बाजार समितीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना व सामान्य नागरिकांना सुख-सुविधा प्राप्त करून देण्यासाठी यशवंतराव माने यांचे योगदान मोलाचे आहे. तसेच यशवंतराव माने हे उद्योजक असल्यामुळे त्यांचा पश्चिम महाराष्ट्रात दांडगा जनसंपर्क आहे व सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत त्यामुळे यशवंतराव माने यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उमेदवार म्हणून संधी देण्यात आल्याचे कळते.

मोहोळ मतदार संघातून यशवंतराव माने यांना संधी मिळण्यासाठी इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते यांनी पक्षाकडे शिफारशी केल्या होत्या तसेच मागील काही वर्षापासून मोहोळ मतदारसंघातील जनतेशी थेट संपर्क माने यांनी ठेवल्यामुळे त्यांना येथील विधानसभा लढण्यासाठी संधी देण्यात आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांना राजकारणात इंदापूर तालुक्यातील जनतेने सातत्याने पाठबळ देतात राजकीय उंची वाढवण्यासाठी मोलाची मदत केल्याने इंदापूर तालुक्याला बक्षीस म्हणून दुसरा आमदार दिल्याची चर्चा पुणे जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)