कोरेगाव भीमा – कोण आला रे कोण आला शरद पवारचा वाघ आला.. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विजय असो.. शरद पवार झिंदाबाद.. आमदार अशोक पवार झिंदाबाद.. राष्ट्रवादी पुन्हा या गाण्यावर ताल धरत कोरेगाव भीमामध्ये कार्यकर्त्यांनी उमेदवार ऍड. अशोक पवार यांच्या विजयाचा जल्लोष केला.
शिरुर विधानसभा निवडणुकीतील निकाल जाहीर होण्यास जशी सुरुवात झाली तेव्हापासून राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस मित्र पक्षाचे उमेदवार ऍड. अशोक पवार यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली. फटाके फोडून गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. कोरेगाव भीमा गावामधून 423 मतांची आघाडी पवार यांना देण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष नारायणराव फडतरे, पी. के. गव्हाणे, बाळासाहेब फडतरे, अशोककाका गव्हाणे, रविंद्र फडतरे, बबुशा ढेरंगे, तुळशिराम फडतरे, विजय गव्हाणे, महेश ढेरंगे, अशोक ढेरंगे, रविंद्र फडतरे, राहुल ढेरंगे, सुनिल गव्हाणे, राहुल फडतरे, अमिर इनामदार, हेमंत ढेरंगे, अब्जल तांबोळी, सुरेंद्र भांडवलकर, बालाजी भांडवलकर, जगदिश खैरे, सचिन परदेशी, आदीसह असंख्य कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते.
त्याच बरोबरच सोशल मिडीयावर जसे पवार यांच्या मतदानात भर पडत त्या प्रत्येक फेरीला दिसतोय फरक तर आता वातावरण फिरलंय या वाक्याने सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला होता.