दिलीप मोहिते-पाटील पुन्हा आमदार झाले : गोरेंचा 33 हजार 242 मतांनी पराभव
राजगुरूनगर – खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील हे 33 हजार 242 हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना 96 हजार 866 मते मिळाली आहेत. त्यांनी शिवसेनेचे सुरेश गोरे यांचा दारुण पराभव केला. मतमोजणीत सुरुवातीपासून मोहिते यांनी आघाडी घेतली ती कमी झालीच नाही. निवडीनंतर दिलीप मोहिते पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
पुणे जिल्ह्यात अत्यंत चुरशीची ठरलेल्या या विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिलीप मोहितेपाटील, शिवसेनेचे सुरेश गोरे, अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांच्यात तिरंगी लढत झाली. निवडणूक निरीक्षक पियूष मुखर्जी यांच्या उपस्थित निवडणूक निर्णय अधिकारी संजय तेली, सहाय्य्क निवडणूक निर्णय अधिकारी सुचित्रा आमले यांच्या निगराणीखाली गुरुवारी (दि. 24) मतमोजणी सुरू झाली. पहिल्याच फेरीतदिलीप मोहिते पाटील यांनी आघाडी घेतली.
पाचव्या फेरीत4 हजार 694 ची दिलीप मोहिते यांनी अपक्ष उमेदवारासोबत लढत देत आघाडी घेतली. 10 व्या फेरीतदिलीप मोहिते पुढेच राहिले त्यांनी दहाव्या फेरीत 5 हजार 146 मतांची आघाडी कायम ठेवली. 15व्या फेरीत विद्यमान आमदार सुरेश गोरे हे तिसऱ्या क्रमांकावर गेले. अपक्ष उमेदवार अतुल देशमुख व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिलीप मोहिते यांच्यात चुरशीची लढत झाली. अतुल देशमुख यांच्या पेक्षा तब्बल 7 हजार 570 एवढ्या मतांनी पुढे गेले 17व्या फेरीत अतुल देशमुख तिसऱ्या क्रमांकावर गेले तर सुरेश गोरे यांनी मुसंडी मारली; मात्र दिलीप मोहिते यांचे लीड त्यांना कमी करण्यात अपयश आले.
या फेरीत मोहिते यांना 12 हजार 858 मतांनी आघाडी घेतली. 20 व्या फेरीत मोहिते हेच आघाडीवर होते. ते 20 हजार 775 मतांनी पुढे होते. 25 व्या फेरीनंतरही मोहितेच पुढे राहले तर अंतिम 28 व्या फेरीत दिलीप मोहिते तब्बल 33 हजार 242 मतांनी विजयी झाले. एकूणच एक ते 28 फेऱयांमध्ये दिलीप मोहिते पाटील यांनाच आघाडी मिळत राहिल्याने त्यांनी शिवसेनेचा दारुण पराभव केला.