सामाजिक न्याय विभागाचा उपक्रम
कोथरूड – राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभाग पुणे शहराच्या वतीने विभागाची शहर कार्यकारिणी आणि आठ विधानसभा कार्यक्षेत्रातील पदाधिकारी यांचा तीन लाख रुपयांचा विमा उतरवण्याच्या उपक्रमाला आज सुरुवात करण्यात आली. सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विजय डाकले यांच्या वतीने हा उपक्रम राबवला जात आहे.
अडचणीच्या काळात कार्यकर्त्याला मदतीचा हात मिळावा म्हणून हा उपक्रम राबवण्यात आल्याचे डाकले यांनी सांगितले. शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्या हस्ते आज कार्यकर्त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. या उपक्रमांतर्गत 400 हून आधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विमा उतरवण्यात येणार आहे.
राज्यात पहिल्यांदाच कार्यकर्त्यांसाठी असा कार्यक्रम राबविला जात आहे. यावेळी वैजनाथ वाघमारे , संतोष बेंद्रे, लहु कांबळे, संदीप गाडे, मोहन सोनावणे, शंकर तेलंगे, विजय बगाडे, सचिन डाकले, आकाश ढावरे उपस्थित होते.