सातारा – लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील १४ मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. सातारा जिल्ह्यातही मतदान करण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. यावेळी छ. आ. शिवेंद्रराजे भोसले व त्यांच्या पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले अधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.