शिवसेनेत महापौरांना हटवण्याची धमक नाही – विद्या चव्हाण

मुबंई – महापौरांविरोधात वारंवार आंदोलने करूनही सत्ताधाऱ्यांवर परिणाम होत नाही, त्यामुळे पुढील काळात हे आंदोलन मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व आमदार विद्या चव्हाण यांनी दिला आहे.

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी एका महिलेशी गैरवर्तन केले तसेच नंतर दबावतंत्राचा वापर केला. अशा बेशिस्त महापौरांची हकालपट्टी करण्यासाठी शिवाजी पार्क इथे आज सर्वपक्षीय महिलांनी आंदोलन पुकारले. यावेळी विद्या चव्हाण बोलत होत्या.

महिलांच्या प्रश्नांबाबत बोलणाऱ्या शिवसेना आ. नीलम गोऱ्हे याप्रकरणी मूग गिळून गप्प बसल्या आहेत. शिवसेनेत महापौरांना हटवण्याची धमक नाही, अशी टीका देखील त्यांनी शिवसेनेवर केली.

यावेळी तीव्र निदर्शने करून ‘मुंबई बचाव-महापौर हटाव’ ,महापौरांनीं राजीनामा दिलाच पाहिजे या मागणीकरिता ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुंबई राष्ट्रवादीसह अनेक महिला कार्यकर्त्या आणि वाघिणी संघटना कार्यकर्त्या ,अखिल भारतीय विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनात मुंबई विभागीय महिला अध्यक्ष सुरेखा पेडणेकर देखील उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.