#NSSO: जनतेला उत्तर देणार की आताही ‘मौन’च बाळगणार? : सुप्रिया सुळेंचे भाजपला खडे बोल

File photo

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेच्या (NSSO) दोन अधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याने केंद्रातील भाजप सरकार चांगल्याच अडचणींमध्ये सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘NSSO’च्या अधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने मोदी सरकारवर विरोधी पक्षांकडून आरोपांच्या फैरी झाडण्यात येत असून नोटाबंदीमुळे देशामधील बेरोजगारीचे प्रमाण गेल्या चार दशकांमधील शिखरस्थानी पोहोचले असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेचा (NSSO) अहवाल प्रसिद्ध न करण्याचे कारण ‘बेरोजगारी’ हेच आहे का? आता तरी जनतेला उत्तर देणार का पुन्हा ‘मौन’च बाळगणार? असा खडा सवाल त्यांनी ट्विटरद्वारे भाजप सरकारला विचारला आहे.  

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)