मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोखठोक वक्तव्य आणि बिनधास्त बोलण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकदा राजकीय वाददेखील होताना दिसतात. यामुळे ते अनेकवेळा अडचणीत सापडतात. आता ते पुन्हा एकदा वादात अडकले आहेत.
दिल्लीत मीडियाशी गप्पा मारताना अजितदादांनी मोठा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली होती. राष्ट्रवादीतील बंडाआधी आपण मास्क आणि टोपी घालून वेश बदलून दिल्लीला जायचो असं विधान त्यांनी केलं होतं. यावरुन राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षासह शिवसेना ठाकरे गटानेही अजित पवारांवर टीकेची झोड उठवताना याची चौकशीची मागणी लावून धरली होती. यावर अजितदादांनी वेशांतर करुन दिल्लीवारी केल्याच्या चर्चांना धांदात खोटे ठरवत विरोधकांना खडसावलं होतं.
हम तो डूबेंगे ही "दादा" तुम्हें भी ले डूबेंगे..!!
बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा..!! pic.twitter.com/c3CKlOBFrd
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) August 3, 2024
सुनील तटकरेंचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
शरद पवार गटानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरेंचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत पुन्हा एकदा अजित पवारांची गोची केली आहे. हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार गटातला वाद पेटण्याची शक्यता आहे.