#लोकसभा2019 : रावेरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेससाठी सोडली

पुणे – काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाआघाडीने पुणे, रावेर वगळता सर्वत्र उमेदवार जाहीर करण्यात आले होते. मात्र, आज राष्ट्रवादीने रावेर मतदार संघ काँग्रेसला सोडल्याचे स्पष्ट केल्याने रावेर मतदारसंघाचा तिढा सुटला आहे. आता फक्त पुण्यातील उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रावेर मतदार संघातील जागेबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ” महाआघाडीच्या जागावाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. काँग्रेसचा रावेर मतदारसंघासाठी आग्रह होता. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून रावेर मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात येत असून जळगावची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवेल, असा निर्णय झाला आहे”.

Leave A Reply

Your email address will not be published.