मुख्यमंत्र्यांची वल्गना पोट फुगवणाऱ्या बेडकीप्रमाणे – राष्ट्रवादी

पुणे – आता चूक करायची नाही आता बारामतीमध्ये फक्त कमळ, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथील भाजपा बूथ प्रतिनिधी मेळाव्यात केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक होताना दिसत आहे. राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांच्या या विधानास मुंगेरीलाल के हसीन सपनें असं म्हणत जोरदार टीका केली आहे.

राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. चार राज्यांत फटका बसल्यानंतरही स्वप्नरंजनातून बाहेर निघण्यास काही भाजप तयार नाही. आता बारामती जिंकण्याच्या वल्गना करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाहून पोट फुगवणाऱ्या बेडकीच्या गोष्टीची आठवण होते. यांच्या स्वप्नांचा फुगा मतदार फोडल्याशिवाय राहणार नाहीत, अशी जोरदार टीका राष्ट्रवादीने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

राष्ट्रवादीने यासंबंधी एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामध्ये नगरपालिकेत राष्ट्रवादीचे 44 पैकी 42 नगरसेवक ,जिल्हा परिषदमध्ये 6 पैकी 6 सदस्य, पंचायत समितीमध्ये 12 पैकी 12 सदस्य आहेत आणि भाजपाला मात्र त्याठिकाणी भोपळाही फोडता आला नाही आणि म्हणे बारामती जिंकणार अस दाखवत भाजपावर टीका केली आहे.

https://twitter.com/NCPspeaks/status/1094220586010562560

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)