Parth Pawar : महाराष्ट्रातील रिक्त राज्यसभा जागांवरून महायुतीमध्ये मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या असून, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत समीकरणं वेगाने बदलताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, पक्षात आता पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांचं वाढतं वर्चस्व स्पष्टपणे जाणवत असून, राज्यसभेच्या एका जागेसाठी नव्या चेहऱ्यांची चर्चा रंगली आहे. (Parth Pawar) बारामती पोटनिवडणुकीनंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून, कोणाला संधी मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. (Parth Pawar) छगन भुजबळांचा पत्ता कट? ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राज्यसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी त्यांना राज्यातील राजकारणातच सक्रिय ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. आगामी विधानसभा निवडणुका आणि संघटनात्मक जबाबदाऱ्या लक्षात घेता भुजबळांना दिल्लीऐवजी महाराष्ट्रातच भूमिका दिली जाण्याची शक्यता आहे. (Parth Pawar) ‘या’ नावांची जोरदार चर्चा सध्या राष्ट्रवादीच्या गोटात काही नव्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामध्ये सुबोध मोहिते, अविनाश आदिक, प्रमोद हिंदुराव, संजय काकडे या नावांचा समावेश असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, या सर्व नेत्यांना पार्थ पवारांच्या निकटवर्तीयांमध्ये गणलं जात असल्याने पक्षात नव्या नेतृत्वाला प्राधान्य दिलं जात असल्याचं चित्र दिसत आहे. (Parth Pawar) पार्थ पवारांची नवी फळी सक्रिय राष्ट्रवादी फुटीनंतर पक्ष संघटना पुन्हा उभी करण्यामध्ये पार्थ पवार यांची भूमिका वाढली असल्याचं बोललं जात आहे. दिल्ली पातळीवरील संपर्क, संघटनात्मक समन्वय आणि तरुण नेतृत्वाला पुढे आणण्याच्या रणनीतीमुळे पार्थ पवारांचा प्रभाव वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Parth Pawar) निवडणूक कार्यक्रम २५ मे २०२६ – अधिसूचना जारी १ जून – उमेदवारी अर्जाची अंतिम तारीख २ जून – अर्ज छाननी ४ जून – अर्ज माघारीची अंतिम तारीख १८ जून – मतदान २२ जून – मतमोजणी व निकाल