राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसाची ऑफिसमध्येच आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये धक्कादायक खुलासा

उस्मानाबाद – राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यालयातच गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथील हा पदाधिकारी असून आत्महत्या करण्यापुर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहली आहे.

हणमंत दणाने असे आत्महत्या करणाऱ्या पदाधिकाऱ्याचे नाव असून लोहारा तालुक्यातील वडगाव येथील कार्यालयात त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. दणाने हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस होते. याप्रकरणी पोलिसांनी त्वरित गावातील दोन महिलांसह एका पुरुषाला अटक केली आहे.

गावातील मायादेवी दत्तात्रय गायकवाड, दत्तात्रय कचराप्पा गायकवाड, स्वाती दत्तात्रय गायकवाड यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे दणाने यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.