शिवसेना चोरावर मोर आहे का..? – नवाब मलिक

पुणे – जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे गुरूवारी दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये 40 भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर देशात सर्वत्र या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मात्र पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला त्यादिवशी मातोश्रीवर युतीची चर्चा सुरू होती, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेना-भाजपवर जोरादार टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरव्दारे शिवसेना-भाजपवर टीका करत निशाना साधला आहे. नवाब मलिक यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला, त्यादिवशी मातोश्रीवर युतीची चर्चा सुरू होती. कालपर्यंत चौकीदार चोर आहे असे म्हणणारे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज मात्र युती करण्याची तयारी दाखवत आहेत. याचा अर्थ शिवसेना चोरावर मोर आहे का ? असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

तसेच त्यांनी शिवसेनाबरोबर भाजपवर टीका केली आहे. दहशतवादी हल्लानंतरही भाजपचा प्रचार थांबत नाही. या हल्ल्याचा राजकीय फायदा उठवण्याचं काम भाजप करत आहे, असं मलिक यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.