राष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस यांचे निधन

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस तालुक्याचे आमदार हनुमंत डोळस यांचे निधन झाले आहे. मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.पोटाच्या कर्करोगाने आजारी असलेल्या डोळस यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून उपचार सुरू होते.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2014 साली हुनमंत डोळस यांना उमेदवारी देण्यात आली होती. माळशिरस हा मतदारसंघ राखीव असून त्या मतदारसंघातून ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजयी झाले. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या माळशिरस मतदारसंघातून आमदार डोळस हे 2009 आणि 2014 मध्ये आमदार झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.