मुंबई – राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या नेत्या आणि बहीण पंकजा मुंडेंचा पराभव केला. आज भाऊबीजनिमित्त मुंडे यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
जिव्हाळ्याचे नाते दर दिवसागणिक उजळत राहू दे
भाव बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे…महाराष्ट्रातील माझ्या सर्व भगिनींना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!#Bhaubeej #Deepavali #Deepotsav2019 #HappyDiwali #HappyDeepavali pic.twitter.com/RRPtYSv4i7
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 29, 2019
“जिव्हाळ्याचे नाते दर दिवसागणिक उजळत राहू दे…भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे… महाराष्ट्रातील माझ्या सर्व भगिनींना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!” अस ट्विट करत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी सोमवारी सुप्रिया सुळे यांच्यासोबतचा फोटोही ट्विटरद्वारे शेअर केला. सुप्रिया सुळेंच्या फोटोसोबत ट्विट करताना मुंडेंनी “मानलेल जरी असल…तरी रक्ताच्या नात्याहून कमी नसत…बहिण भावाचे नात असंच अनमोल असतं! उद्या भाऊबीज आणि आजच गोविंदबागेत सुप्रियाताई सुळे यांनी शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिला. भाऊबीजेच्या आधीच मला आशीर्वादरुपी भाऊबीज मिळाली त्याचा आनंद शब्दात व्यक्त करण सुद्धा कठीण आहे. ” असं त्यांनी म्हटलं होतं.