जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांना टोला म्हणाले, ‘सत्ता गेल्यावर काही लोक भ्रमिष्ट होतात, तर…

सांगली – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. ‘सत्ता गेली की कोणा भ्रमिष्ट होतं,तर कोणाचा तोल जातो, त्यामुळे चंद्रकांत पाटलांचे यापैकी काय झाले, याचे संशोधन कराव लागेल असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले की, ‘सत्ता गेल्यावर काही लोक भ्रमिष्ट होतात. तर काहींचे तोल जातो, त्यामुळे आता चंद्रकांतदादांचा यापैकी नेमकं काय झालं याचं संशोधन करावे लागेल.

‘शरद पवार त्यांचे बोट धरून आपण राजकारणात आलो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. त्यामुळे चंद्रकांतदादा यांनी खाजगीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एकेरी भाषा वापरली असेल, असे मत मंत्री पाटील यांनी व्यक्त केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.