मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ठाणे महापालिकेतील चार नगरसेवकांनी पक्ष सोडला असून हे नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटात सामील होण्याची शक्यता आहे. राधाबाई जडवार, दिगंबर ठाकूर, वनिता घोगरे आणि हनुमंत जगदाळे अशी राष्ट्रवादीच्या या चार नगरसेवकांची नावे आहेत.
ठाण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यशैलीवर टीका करीत पक्ष सोडला आहे. 2017 च्या निवडणुकीत ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकूण 34 नगरसेवक निवडून आले होते व शिवसेनेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला हा बसलेला हा मोठा मानला जात धक्का आहे.