रेडा – राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी असताना इंदापूर तालुक्यातही हा धर्म पाळला जाण्याचे आदेश लवकरच निघतील, असे संकेत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी इंदापूर कॉंग्रेस कार्यालयाला भेट दिल्याने मिळत आहेत. माजी मंत्री पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या गेल्या काही दिवसांपासून उठत असताना राष्ट्रवादी आघाडी धर्माचे पालन करेल, असा विश्वास पाटील यांच्याकडून व्यक्त केला जात आहे.
दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांना रूचले नाही…
इंदापूर तालुका कॉंग्रेसचे कार्यालय तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या इंदापूर शहरात आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे कार्यालय कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी भरलेले असायचे. मात्र, गेल्या काही दिवसात या कार्यालयातील सर्व साहित्य नूतनीकरणासाठी इतर ठिकाणी नेलेले असताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अनुपस्थित राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी कॉंग्रेस भवनला भेट देणे या दोन्ही पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना रूचलेले नाही.