मुंबई – युपीए सरकारच्या काळात एअर इंडियासाठी झालेल्या विमान खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा संशयावरून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांना ईडी अर्थात सक्त अंमलबजावणी संचालनालयातर्फे समन्स बजावण्यात आले आहे. प्रफुल्ल पटेल यांना ईडीद्वारे चौकशीसाठी ६ जून रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून ७०,००० कोटी रुपये किंमत असलेल्या १११ विमानांची खरेदी, भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या विमानांचे व्यवहार आणि एयर इंडियाच्या विमानांच्या प्रवास मार्गांविषयीचे निर्णय यामध्ये ईडीला अनियमितता आढळून आल्याने तत्कालीन नागरी उड्डाण मंत्री पटेल यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे.
दरम्यान, या चौकशीला आपण आनंदाने हजर राहुन त्यांना पुर्ण सहकार्य करू असे पटेल यांनी म्हटले आहे. या व्यवहारातील गुंतागुत ईडीच्या लक्षात आणून देणे आपल्याला आवडेल असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
मनि लॉड्रिंगच्या प्रकरणाची चौकशी करताना विमान वाहतूक खात्याशी लॉबिंगचे काम करणाऱ्या दीपक तलवार यांच्याकडून पटेल यांच्याविषयीची काही माहिती मिळाली आहे. त्या अनुषंगाने त्यांची चौकशी केली जाणार असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. तलवार हे पटेल यांच्या कायम संपर्कात होते अशी माहिती ईडीला मिळाली आहे.
Former Civil Aviation Minister and NCP leader Praful Patel to ANI: I will be happy to cooperate with the Enforcement Directorate to help them understand the complexities of aviation sector. pic.twitter.com/Q8n6uZdBEO
— ANI (@ANI) June 1, 2019