‘आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल’, बारामतीमध्ये रंगली पोस्टरची चर्चा

बारामती – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी त्यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या भाजपच्या गोपीनाथ पडळकर यांचा तब्बस १ लाख ६५ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. त्यानंतर आता पोस्टरबाजीला उधाण आले आहे. ‘आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल,’ अशा आशयाचे पोस्टर्स बारामतीमध्ये झळकले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी ढाण्या वाघ संबोधलेल्या भाजपच्या गोपीनाथ पडळकरांसह सर्वच उमेदवारांचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला. तसंच त्यांच्यासमोरील सर्वच उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले होते. त्यानंतर अजित पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानाजवळ त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लावण्यात आले. त्यावरील  मजकूर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ‘आमच्या येथे डिपॉझिट जप्त करुन मिळेल’ असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आला आहे. त्यामुळे बारामतीसह सर्वत्र या पोस्टर्सचीच चर्चा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.