सातारा, (प्रतिनिधी) : येथील विश्वजित लक्ष्मण किर्तीकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली असून त्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले.
विश्वजित किर्तीकर हे मूळचे सातारा तालुक्यातील आरेदरे, ता. सातारा येथील असून पुण्यात स्थायिक आहेत. रेल्वे प्रशासनात अधिकारी म्हणून उल्लेखनीय काम करुन ते निवृत्त झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सोपान उर्फ काका चव्हाण यांनी किर्तीकर यांची ही नियुक्ती केली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र सोपान चव्हाण यांच्या हस्ते पक्षाच्या वडगाव बुद्रुक येथील कार्यालयात विश्वजित किर्तीकर यांना देण्यात आले.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या उपाध्यक्षपदी आपली निवड करण्यात आली असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खा. सुप्रियाताई सुळे यांच्या आदेशानुसार पक्षाची ध्येय, धोरणे जनसामान्यांपर्यत पोहोवून आपण संघटन वाढीसाठी प्रयत्न करावेत असे नियुक्तीपत्रकात नमूद आहे.
या निवडीबद्दल विश्वजित किर्तीकर यांचे राहूल किर्तीकर, चंद्रकात देवरुखकर, अनिल कांबळी, शिवाजी कदम, मधुकर मोहिते, दिनकर भोसले, सुरेश राजपुरे, बाळासाहेब महाडिक साठे, पुणे रिजनचे रेल्वे कर्मचारी यांनी अभिनंदन केले.