भाजपा-शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – जयंत पाटील

कोल्हापूर – कोल्हापुरात शिवसेनेचा पराभव करण्यासाठी लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकसंघ राहून काम करतील. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातल्या आघाडीच्या दोन्ही जागा जिंकू, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की,  धनंजय महाडिक आणि हसन मुश्रीफ हे पुढील 4 दिवसांत शहरातील कार्यकर्त्याना भेटून शंका दूर करतील. काँग्रेस- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकसंघ राहून काम करतील

भाजपच्या पापात शिवसेना 50 टक्के सहभागी असून सत्तेत असताना 5 वर्षे  ते भांडत राहिले. भाजपा- शिवसेना म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी अशी टीका देखील त्यांनी भाजप-शिवसेना सरकारवर केली.

लोकसभेत बोलणारा खासदार जाऊ देत. म्हणून धनंजय महाडिक यांना मदत करा. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुका देखील एकत्रित लढवू, असंही यावेळी ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.