हडपसर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा सर्वसामान्यांना न्याय देणारा, विश्वास देणारा आणि जनतेशी नाळ जोडणारा पक्ष आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक कुटुंब म्हणून सर्वांची काळजी घेणारा हा पक्ष आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हडपसर विधानसभा मतदार संघाचे सरचिटणीस विठ्ठल विचारे पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त हडपसर काळे-बोराटे नगर येथील एकता फाउंडेशनच्या वतीने परिसरातील नागरिकांना तसेच भाजी विक्रेते व दुकानदार यांना मोफत मास्क वाटप करण्यात आले.त्यावेळी विचारे पाटील बोलत होते.
आमदार चेतन तुपे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस राजलक्ष्मी भोसले आणि शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एकता फाऊंडेशन चे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हडपसर विधानसभा सरचिटणीस विठ्ठल विचारे पाटील यांच्या पुढाकाराने काळे-बोराटे नगर येथे कोव्हीड-19 चे नियम पाळून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मोफत मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी नगरसेवक योगेश ससाणे, प्रभारी अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, स्विकृत सदस्य अविनाश काळे, माजी स्विकृत सदस्य संजय शिंदे, प्रभाग क्रमांक २३ राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष उद्धव भोसले, सामाजिक कार्यकर्ते आण्णा भालेकर,शिवदास पवार,भारत गिलबिले व परिसरातील नागरिक उपस्थित होते.