नगर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिना निमित्त सिध्दार्थनगर येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, अंकुश मोहिते, पप्पू पाटील, दीपक मोहिते, सतीश साळवे, महेश आठवले, दीपक सरोदे, रोहित केदारे, येशुदास वाघमारे, विकी साठे, लकी शेलार, गणेश बोरुडे, गुलाब गाडे, संतोष जगधने आदी उपस्थित होते.
यावेळी विधाते म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी समाज जागृतीचे महान कार्य केले. अण्णाभाऊ साठे केवळ लोकशाहीर नव्हे, तर ते दर्जेदार साहित्यिक होते. त्यांनी आपल्या साहित्यातून जनजागृतीचे कार्य केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ व गोवा मुक्ती संग्राममध्ये त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.
सामान्य कष्टकरी जनतेच्या न्याय हक्कासाठी त्यांनी लढा दिला. त्यांचे कार्य व विचार प्रेरणादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.