राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला केरळमध्ये एक मंत्रिपद

विजयन यांचा गुरूवारी शपथविधी

थिरूवनंतपूरम, दि.17 – केरळचे मुख्यमंत्री म्हणून डाव्या आघाडीचे नेते पिनराई विजयन सलग दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह नव्या मंत्रिमंडळातील 21 सदस्यांचा शपथविधी गुरूवारी होईल. त्या राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला एक मंत्रिपद आले आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारत डाव्या आघाडीने केरळची सत्ता राखली. त्या आघाडीने 140 पैकी 99 जागा पटकावल्या. त्यामुळे दर पाच वर्षांनी सत्तापालट होण्याची केरळमधील परंपरा खंडित झाली. त्यातून डाव्या आघाडीच्या विजयाकडे ऐतिहासिक म्हणून पाहिले जात आहे. आता ती आघाडी नवे सरकार स्थापण्यास सज्ज झाली आहे.

डाव्या आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या माकपच्या वाट्याला सर्वांधिक 12 मंत्रिपदे आली आहेत. त्याखालोखाल भाकपचे 4 मंत्री असतील. केरळ कॉंग्रेस(एम), जनता दल(एस) आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 1 मंत्रिपद मिळेल. तर, उर्वरित 2 मंत्रिपदे इतर चार पक्षांना आलटून-पालटून दिली जाणार आहेत. केरळमध्ये राष्ट्रवादीचे 2 आमदार आहेत. तो पक्ष राष्ट्रीय स्तरावर आणि महाराष्ट्रात कॉंग्रेसचा मित्रपक्ष आहे. मात्र, केरळमध्ये राष्ट्रवादी डाव्या आघाडीचा घटक बनला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.