फलटण – फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील 78 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्ता प्रस्थापित केली आहे, असा दावा जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केला आहे. विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून अव्याहत सुरू असलेली विकासगंगा खंडित होऊ न देण्याचे काम मतदारसंघातील जनतेने केले आहे. फलटण तालुका राजे गटाच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
फलटण तालुक्यातील सरडे, कापशी, राजुरी, अलगुडेवाडी, सस्तेवाडी, हिंगणगाव, खुंटे, जिंती, मुंजवडी, तावडी, साठे, घाडगेवाडी, शिंदेनगर, कोळकी, सांगवी, नांदल, पिराचीवाडी, काशीदवाडी, जावली, शेरेशिंदेवाडी, खराडेवाडी, ठाकुरकी, खामगाव, सासकल, तिरकवाडी, डोंबाळवाडी, रावडी बुद्रुक, सोनवडी खुर्द, घाडगे मळा, कापडगाव, भिलकटी, जाधववाडी (फ.), वाघोशी, कुरवली बुद्रुक, मुळीकवाडी, निरगुडी, बोडकेवाडी, गुणवरे, आळजापूर, फडतरवाडी, निंभोरे, कोऱ्हाळे, टाकळवाडा, जाधववाडी (ता.), वडजल, ढवळ, बिबी, होळ, सोनगाव, मलवडी, ढवळेवाडी (निं.), आंदरुड, नाईकबोमवाडी, तडवळे, झिरपवाडी
मुरुम, भाडळी बुद्रुक, काळज, आरडगाव, वडगाव, रावडी खुर्द, सोनवडी बुद्रुक, शेरेचीवाडी (ढ.), शिंदेवाडी, कोरेगाव, धुळदेव, मिरढे, हणमंतवाडी, पवारवाडी आणि कोरेगाव तालुक्यातील नांदवळ, अनपटवाडी, चौधरवाडी, सोळशी, तडवळे (सं.) वाघोली, वाठार स्टेशन, फडतरवाडी, दहीगाव, राऊतवाडी, या ग्रामपंचायतींवर राजे गटाने वर्चस्व मिळवल्याचे संजीवराजे यांनी सांगितले.