Pune : भाजप आमदाराच्या व्हायरल ऑडिओ क्लिपप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

आमदाराच्या राहत्या सदनिकेच्या सोसायटीच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आंदोलन

पुणे : भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनील कांबळे यांनी पुणे महानगरपालिकेतील महिला आधिकाऱ्यांस शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असून या विरोधात सुनील कांबळे यांच्या बिबवेवाडी येथील राहत्या सदनिकेच्या सोसायटीच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आंदोलन करण्यात आले.

यावेळी सुनील कांबळे यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महिलाध्यक्षा मृणालिनी वाणी यांनी जाहीर निषेध नोंदवला.

या वेळी नगरसेविका अश्विनी कदम, संतोष नांगरे, जयदेव इसवे, नितीन कदम, बाळासाहेब अटल आदी यांच्यासह इतर महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.