नवी दिल्ली: कोविड-19 विरुद्धच्या राष्ट्रव्यापी अभियानात राष्ट्रीय छात्र सेनेने (एनसीसी) प्रशासनाला मदतीचा हात पुढे केला आहे. साथीच्या आजारा विरुद्धच्या लढाईत सहकार्य करण्यासाठी एनसीसीने त्यांच्या कॅडेट्सच्या तात्पुरत्या रोजगारासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
एनसीसी कॅडेट्ससाठी नियोजित कामांमध्ये हेल्पलाइन, कॉल सेंटरचे व्यवस्थापन, मदत पुरवठा, औषधे, अन्न. आवश्यक वस्तूंचे वितरण, समुदाय सहकार्य, डेटा व्यवस्थापन आणि सार्वजनिक ठिकाणी लोकांना रांगा लावून उभे राहण्याची व्यवस्था आणि रहदारी व्यवस्थापन यांचा समावेश आहे.
केवळ 18 वर्षा वरील वरिष्ठ विभागीय कॅडेट्सची नियुक्ती केली जाऊ शकते. कायमस्वरूपी शिक्षक किंवा सहयोगी एनसीसी अधिकाऱ्याच्या देखरेखी अंतर्गत 8 ते 20 जणांच्या छोट्या गटात त्यांची नियुक्ती केली जाऊ शकते.
स्वयंसेवक कॅडेट्सच्या तैनातीसाठी राज्य सरकार, जिल्हा प्रशासनाला राज्य एनसीसी संचालनालयामार्फत विनंती पाठवावी लागते. त्याचे तपशील एनसीसी संचालनालय, गट मुख्यालय, युनिट स्तरावर राज्य सरकार, स्थानिक नागरी प्राधिकरणाशी समन्वयाने निश्चित करतील.
संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत एनसीसी ही देशातील सर्वात मोठी गणवेशधारी युवा संघटना आहे आणि विविध सामाजिक सेवा आणि समुदाय विकास उपक्रम राबवित असते.