मुंबई – अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) बॉलीवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याला नोटीस बजावली आहे. व्हायरल झालेल्या एका व्हिडीओच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी ते पाऊल उचलण्यात आले आहे.
करणकडून त्या व्हिडीओबाबत माहिती मागवण्यात आली असल्याचे समजते. करणच्या घरी मागील वर्षी एक पार्टी झाली. त्यामध्ये अनेक कलाकार सहभागी झाल्याचे दर्शवणारा तो व्हिडीओ आहे. त्या पार्टीत अंमली पदार्थांचे सेवन करण्यात आल्याचा आरोप होत आहे. काही महिन्यांपूर्वी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केली.
View this post on Instagram
त्या प्रकरणाच्या तपासावेळी बॉलीवूडचे अंमली पदार्थ कनेक्शन समोर आले. त्यावरून काही कलाकार एनसीबीच्या रडारवर आले आहेत.
दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर करणने काही दिवसांपूर्वी निवेदन जारी करून पार्टीत अंमली पदार्थांचे सेवन झाल्याचा इन्कार केला होता.