हॉटफुट स्पर्धेत नाझ अकादमीचे वर्चस्व

पुणे: हॉटफुट युवा साखळी आंतर अकादमी फाईव्ह-अ-साईड फुटबॉल स्पर्धेच्या 8 आणि 14 वर्षाखालील गटात नाझ फुटबॉल अकादमीने आगेकुच केली.

या स्पर्धेच्या 8 वर्षाखालील गटात नाझ एफए अ संघाने आयएफा संघावर 13-0 असा दणदणीत विजय मिळवला. सामन्यामध्ये फरहान शेख याने 7 गोल नोंदविले. 14 वर्षाखालील गटात नाझ एफए संघाने दिएगोज्‌ ब संघाचा 11-0 असा धुव्वा उडविला.

यामध्ये समीर केदार याने 5 गोल नोंदविले. 8 वर्षाखालील गटात फन फिटनेस अकादमीने सलग दोन विजय नोंदविले. यासह दिएगो अ आणि ब संघ, ईएनएनएस बोर्डींग या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव केला. 14 वर्षाखालील गटात स्टार फुटबॉल अकादमी संघाने सलग दोन विजय नोंदविले. यासह स्टेपओव्हर फुटबॉल अकादमी, फाल्कन्स आणि रॉयल एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.