नायर हॉस्पिटल अधिष्ठातांना राज्य महिला आयोगाची नोटीस

मुंबई- मुंबई येथील नायर हॉस्पिटलमधील निवासी डॉ. पायल तडवी यांनी रॅगिंगच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी नायर हॉस्पिटलच्या अधिष्ठातांना नोटीस बजावण्यात आली आहे. कारवाई करण्यासोबतच रॅगिंगविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा तपशीलही आयोगाने मागितला आहे.

वरिष्ठ डॉक्‍टरांच्या रॅगिंगला कंटाळून 26 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्‍टरने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील आहे. पायल तडवी असे आत्महत्या करणाऱ्या नायर रुग्णालयातील निवासी डॉक्‍टरचे नाव आहे.

पायल यांनी 22 मे रोजी रुग्णालयाच्या परिसरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. रुग्णालयातील तीन वरिष्ठ डॉक्‍टरांनी जातीयवादी टीका करून पायलचे रॅगिंग केल्याचा आरोप पायल यांच्या कुटुंबीयांनी केला. याप्रकरणी डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या तिघीही फरार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.