रायपुर: छत्तीसगड मधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. आज सकाळी तुलसी डोंगरी भागात तेथे पोलिसांच्या विशेष टास्क फोर्सचे जवान आणि जिल्हा राखीव पोलिस दलाचे जवान गस्त घालत फिरत होते.
त्यावेळी त्यांना ओडिसा-छत्तीगड सीमा भागात काही संशयास्पद हालचाल आढळून आली. तेथे नक्षलवाद्यांचे वास्तव्य असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्या भागाची नाकेबंदी केली.
त्यावेळी नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर जवानांनीही गोळीबार सुरू केला. त्यात हा नक्षलवादी ठार झाला. कोसा असे ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. तो महुपाधार या स्थानिक संघटनेचा उपकमांडर होता.
घटनास्थळी एक गावठी पिस्तुल, व आयईडी स्फोटके मोठ्या प्रमाणावर आढळून आली ती जप्त करण्यात आली आहेत.