छत्तीसगडमधील चकमकीत महिला नक्षलवादी ठार

रायपुर : छत्तीसगडच्या रेंगईगुडा गावात सुरक्षा दलाच्या जवानंबरोबर झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली आहे. या परिसरात सीआरपीएफ आणि जिल्हा पोलिस दलांचे संयुक्तपथक गस्त घालून परतत असताना त्यांची गाठ या नक्षलवाद्यांच्या गटाशी पडली त्यावेळी ही चकमक झाली. यावेळी दोन महिला नक्षलवादी जखमी झाल्या.

त्या चकमकीच्या ठिकाणी जंगल परिसरात तशाच विव्हळत पडलेल्या आढळून आल्या. त्यांना जवानांनी ताब्यात घेऊन रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तथापी त्यांच्याकडे कोणतीही शस्त्रे आढळून आली नाहीत. त्यातील एका जखमी महिला नक्षलवाद्याचे नंतर रूग्णालयातच निधन झाले. त्यांची नावे अद्याप समजलेली नाहीत. त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या महिला थेट नक्षलवादी नव्हत्या तर त्या नक्षलवाद्यांसाठी काम करीत होत्या असे काहींचे म्हणणे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)