छत्तीसगडमधील चकमकीत नक्षलवादी ठार

बिजापूर (छत्तीसगढ) – छत्तीसगढ राज्यातील बिजापूर येथे नक्षलवादी आणि सुरक्षादले यांच्या मध्ये चकमक झाल्याची माहिती मिळाली आहे. या चकमकीत स्थानिक पोलिसांना मोठे यश मिळाले असून, ठार मारण्यात आलेला नक्षलवादी याची ओळख पटली आहे. शंकर उर्फ कामलू या नक्षलवाद्याचा खात्मा पोलिसांनी केला आहे.

छत्तीसगढ राज्यातील बिजापूर मधील मिरतुर या भागामध्ये पोलीस आणि नक्षलवादी यांच्यामध्ये चकमक झाल्याचे वृत्त मिळाले आहे. या चकमकीत शंकर उर्फ कामलू या नक्षलवाद्याला ठार मारण्यात आले आहे. शंकर उर्फ कामलू या नक्षलवाद्यावर ५ लाख रुपयांचा इनाम ठेवण्यात आला होता. यावेळी त्याच्याकडून ९ एमएम पिस्तूल देखील हस्तगत करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.