छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचे तळ उद्धवस्त

12 नक्षलवाद्यांना अटक करत स्फोटकांसह मोठा शस्त्रसाठा जप्त

नवी दिल्ली : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या बस्तर येथे जवानांनी नक्षलवाद्यांचे तळ उद्धवस्त करत, 12 नक्षलवाद्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी झालेल्या चकमकीत डीआरजीचा एक जवान जखमी झाला आहे. तर, घटनास्थळावरून जवानांनी स्फोटकांसह शस्त्र आणि नक्षली चळवळीशी निगडीत काही सामान देखील जप्त केले आहे.

पोलीसांना किलेपाल आणि मुंडानार गावानजीकच्या जंगलात काही नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार या परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. बुधवारी सायंकाळच्या सुमारास डीआरजीच्या जवानांनी कटेकल्याण आणि पखनार गावाच्या मध्यात असलेल्या जंगलातील नक्षलवाद्यांच्या ठिकाणास घेरले.

जवानांच्या कारवाईची चाहुल लागताच नक्षलवाद्यांकडून जवानांवर गोळीबार सुरू करण्यात आला. ज्याला जवानांकडून सडेतोड प्रतित्युत्तर देण्यता आले. साधारण अर्धातास चाललेल्या चकमकीनंतर जवानांनी 12 नक्षलवाद्यांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले.

याचबरोबर घटनास्थळावरून काही स्फोटकांसह शस्त्र आणि नक्षलवादी चळवळीशी निगडीत असलेले सामान देखील हस्तगत करण्यता आले. या चकमकीत डीआरजीचा एक जवान जखमी झाला असल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.