गडचिरोली – गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदला दुर्गम-अतिदुर्गम भागासह जिल्हाभरातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. मौजा ग्यारपत्ती, मौजा गट्टा(जा), मौजा हेडरी, मौजा कोठी इत्यादी दुर्गम भागांसह इतर भागातील नागरिकांनी या विरोधात एकजूट दर्शविली आहे.
नागरिकांनी नक्षलवादाविरोधात एकत्र येत नक्षलवाद्यांनी दि. 28 जुलै ते 3 ऑगस्टपर्यत नक्षल सप्ताह पाळण्याच्या केलेल्या आवाहनाला केराची टोपली दाखवत जोरदार विरोध केला आहे.
नागरिकांनी ठिकठिकाणी नक्षल विरोधी बॅनर लावून नक्षलवाद्यांना 28 जुलै रोजी नक्षल सप्ताह म्हणून आम्ही आदिवासी जनतेने कशासाठी पाळावा? तसेच आजपर्यंत आदिवासी जनतेच्या विकासासाठी नक्षलवाद्यांनी काय केले? असा सवाल देखील जिल्हाभरातील आदिवासी बांधवांनी नक्षलवाद्यांना केला आहे.